logo
add image
add image
Blog single photo

पोलिस नाईक नितिन गार्डी यांच्याकडून प्लाझ्मा दान


मुळशी : पौड पोलिस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र जाधव यांच्या मातोश्री शशिकला रमेश जाधव या करोनाने त्रस्त आहेत. त्यांना प्लाझ्माची अत्यावश्यक गरज होती. ही माहिती मिळताच पौड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नितीन वसंत गार्डी यांनी प्लाझ्मा दान केला. 

          याबत माहिती अशी की, रविंद्र जाधव हे पौड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्या मातोश्रीवर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना प्लाझ्माची नितांत गरज होती. ही माहिती पोलिस नाईक  नितिन वसंत गार्डी यांनी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान केला. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.


add image
add image

Leave Comments

Top