logo
add image
add image
Blog single photo

पिरंगुट येथे गुरुवारी रक्तदान शिबिर


पिरंगुट - मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. १५) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी सभापती महादेव कोंढरे यांनी दिली आहे.

गुरुवारी (दि. १५) पिरंगुट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे शिबिर होणार आहे. रक्तादन शिबिरात सहभागी रक्तदात्याला हेल्मेट भेट दिले जाणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top